अस्तित्वाची लढाई....
अस्तित्वाची लढाई....
अस्तित्वाची लढाई
लढताेय प्रत्येकजण,
जीवन आणि श्वास
हेच आजचे धन...
अस्तित्वाची लढाई
प्रत्येकाला लढावी लागेल,
करावा संकटाचा पाडाव
अस्तित्व टिकवावं लागेल...
अस्तित्वाची लढाई
पुढ्यात येऊन ठेपली,
जाणीव जागृतीने
तुम्हां आम्हां कळाली
अस्तित्वाची लढाई
बनला जगण्याचा श्वास,
अस्तित्व टिकवणं
हाच राहिला ध्यास...
