अस्तित्व...
अस्तित्व...
काही सवयी चांगल्या असतात तर काही वाईट ...
प्रत्येक सवयीची असते एक वेगळी साईट...
प्रत्येक सवय आपल्या आयुष्यात एक तर आपली जागा उंचावतात किंवा आपली जागा ढासळतात...
काही सवयी दुसऱ्याच नुकसान करतात तर काही दुसऱ्या ना फायदेशीर असतात ...
अशीच माझी एक सवय आहे ...
जी दुसऱ्याच्या मनाचा विचार खूप करते...
आपलं मताला पहिलं प्राधान्य न देता दुसऱ्यांच्या मताला मानते...
दुसऱ्याच्या सुखाचा विचार करते...
मग त्यात मनाला त्रास झाला तरी चालेल ..
समोरचं मत मानून घेते...
ही सवय म्हणू की भावना कधी लोक या चा फायदा घेतात ...तर कधी चांगुलपणा दाखवतात ...
पण ह्या सवयीमुळे दुसऱ्याच मन राखता माझंच मन मात्र रूसून जाते...
ही सवय सोडावीशी वाटते मनाला माझ्या स्वतःचं अस्तित्व द्यावसं वाटते....
