अस्तित्व
अस्तित्व
माहीत आहे ना गं सखे सगळंच तुला
तरी हा वेढे पणा कश्यासाठी ?
नाहीत सापडत उत्तरे कित्येक प्रश्नांची
त्यासाठी हट्ट तुझा कश्यासाठी?
जगलोच नाही मुळी माझ्यासाठी
माझे असे म्हणून काय सांगू
तुला वाटत असेल मी निर्लज्ज
या साठी तुला कारण कोणते सांगू
आजून ही ,मी माझा नाही
दुसऱ्यांचे म्हणणे काय सांगू
सांभाळताना सर्वांच्या मनाला
मी मलाच मारले ,मी काय सांगू
हतबल नसतोच मी मुळी कुणासाठी
समजून मला घेण्या कोणी नाही
कोणालाच नाही उमगलो मी तर
असतो नालायक मी सर्वांसाठी
मी कोण ,अस्तित्व माझे कुणासाठी
तुला हक्क आहे विचारण्याचा
मला ही नाही गं, उत्तर शोधता आले
पण शेवट सांगतो मी फक्त तुझ्यासाठी
