STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Others

3  

Manisha Wandhare

Abstract Others

अस्तित्व जपते आहे...

अस्तित्व जपते आहे...

1 min
2

तु अस्तित्व तुझे जपते आहे ,

ताकतीनिशी दुनियेशी लढते आहे ,

हत्तीचे बळ अंगी बाळगून ,

एकटीच परिस्थितीशी झुंजते आहे ...

काल जे मौन राहीले भर दरबारी,

आज आठवुन तुला रडते आहे,

तु दुर्गा महाकाली चंडीका नाही ,

तु याच युगाची स्त्री शक्ती आहे ...

दुःख तुला जे पदरात दिले ,

तु त्याच दुःखात सुख बघते आहे ,

कोण काय ? बिघडवेल तुझे ,

तु अग्नीत तापून चकाकते आहे ...

नको वरचढ नको हार फुले,

हृदयात जपतांना चालू दे सवे,

अपूर्ण स्वप्ने पुरे करायला ,

बघ मीही सजते आहे ...

शोकांतिका ही ते ना समजले ,

तु सयंमाने अजूनही लढते आहे,

युगानयुगांची कहाणी हीच ,

स्त्री हक्कांसाठी लढते आहे ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract