STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Others

4  

Rohit Khamkar

Tragedy Others

अस्थिर

अस्थिर

1 min
163

काय पाहिजे आहे, तेच नेमक कळत नाही.

वाटत पाटाच पाणी, पाटालाच वळत नाही.


सतत विचार एकलकोंडा, सूड घेतला बुद्धीचा.

पळून पळून थकलो तरी, निशाण नाही हद्दीचा.


पळतोय तर खरा, कार्य म्हणून की कर्म कल्पना नाही.

धगधगत्या त्या उरात, फक्त जिवाची तळमळ होई.


घोटतोय श्वास माझा, म्हणून हुंकार देतोय शब्दाला.

मधमाशीची किंमत विचारा, त्या गोड लागणाऱ्या मधाला.


गोडवा तो हरवलाय, आयुष्याच्या या घडीला.

आनंद विकत घेण्या, दिमाख माझ्या दमडीला.


हालचाल वाढवली तसा, फसत चाललोय या जाळ्यात.

अस्थिरतेचा काहूर माजलाय, मनाच्या या मळ्यात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy