STORYMIRROR

Vasudha Naik

Children

3  

Vasudha Naik

Children

*असं झालं तर*

*असं झालं तर*

1 min
14.3K


असं झालं तर

किती छान होईल

निर्मळ झरा

खळखळ वाहत

माझ्या अंगणात येईल

मग मी त्या झर्‍यात

नाच नाच नाचेन

मित्रांसमवेत खूप

मजा करेन....


असं झालं तर

किती छान होईल

निळसर समुद्र

माझ्या दारात येईल

लाटावर लाटा

त्या लाटामधे

मी सदैव खेळत राहिल..


असं झाल तरं

किती छान होईल

निसर्गात एकच ऋतू

हिवाळा येईल

मग शाळा उशीरा भरेल

जरा अजून लोळायला मिळेल

ऊबदार कपडे घिलायला मिळेल.....


असं झाल तरं

किती छान होईल

मोठेपणा न येता

बालपणातच राहील

या बालपणातच

मी हरवून जाईल......


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Children