अश्रुंच्या विटा
अश्रुंच्या विटा
हातातून सुटलेले क्षण
मोजता येत नाहीत
काहीसे शिल्लक कण
वेचता येत नाहीत
जीवन परिचय एकच
तरीही सुटत राहतो
आनंदाचा साचा फेकतच
मनाला उगी समजवतो
कितीही करा आटापिटा
क्षण सारे आटपले
खोट्या अश्रुंच्या विटा
पाणी खोटे झिरपले
हातातून सुटलेले क्षण
मोजता येत नाहीत
काहीसे शिल्लक कण
वेचता येत नाहीत
जीवन परिचय एकच
तरीही सुटत राहतो
आनंदाचा साचा फेकतच
मनाला उगी समजवतो
कितीही करा आटापिटा
क्षण सारे आटपले
खोट्या अश्रुंच्या विटा
पाणी खोटे झिरपले