खड्डे
खड्डे
रस्त्यांवरचे खड्डे भरतात
मनातले खड्डे बुजतात
खड्डा काहीसा गोल
कुठेतरी साधलेला समतोल
एका कप्प्यात बसलेला
कधीतरी डोकावून पाहिलेला
जागेचा अभाव नसतो
भावनांचा अभाव असतो
किती विचारांनी झाकलेला
कित्येक दुःखांनी ढासळलेला
मुलायम काहीसे शब्द
काहीवेळेस बनती निःशब्द
त्यालाही सांगायचं असतं
खोलीमध्ये काळीज दिसतं
खाच, खळगे आसवांचे
पाण्याविना तसेच झाकायचे