झरा
झरा
प्रवास सुरू
मैल दर मैल
दूरवर नाही तरू
उष्णेतेची नाही ढील
पळतयं सारं
असं वाटतंय
अंतर नाही फार
आता भेटतयं
खेळ वाटेचा
कसा खेळतो
जास्त लांबचा
नजदीक भासतो
पंख असते
तर होईल छान
ब्रेक मारते
अन् वाढते तहान
सगळे इथले
सारे असे प्रवासी
उतरून चालले
कोणी नसे सहवासी
रस्ता पळतो
मन तिथच आहे
हळूच जागवतो
दूर सावलीला पाहे
मनाला जरा
थंड सुकून मिळतो
आता खरा
पाण्याचा झरा झिरपतो