रंग
रंग
खुलवित साऱ्या रंगांसी
शांत पाहून हससी
रंग स्वतःचा नसे
सातजणांचा म्हणून दिसे
रंगांची किमया भारी
सृष्टीची हिरवाई न्यारी
मिसळती एकरूप होऊन
पसरती मना मनातून
बेरंग नको रंगाचा
फटका बसेल फुग्यांचा
एकत्र असून दिखावा
शुद्धतेचा भाव जपावा
रंगांचा मार खावा
पांढरा लपूनी जावा
सगळ्या रंगांचे मिश्रण
पांढऱ्या रंगाचे वाटण
झेलीसी अशा रंगांना
फेकी खोट्या शुभ्राना
महत्व रंगाचे जीवनात
लपे खोट्या सदऱ्यात