कंठ नशिबाचा
कंठ नशिबाचा
1 min
6
आयुष्यातल्या एकेक गोष्टी
निघून जातात
संपत संपत थोड्या
गायब होतात
किती उरवून पुरवून
टाकलेले विचार
परतीच्या वाटेवर काटयांचे
सारे शिवार
मृदगंध थोडा थोडा
पसरत जाताना
दूरवर होतो विरळ
आत परतताना
विचारांनी, यातनांनी मन
जरी भरले
शून्यातून शून्य निघत
कड वितळले
पावला पावलांचा फरक
काय पडतो
ठसठशीत गोंदलेल्या नशिबाचा
कंठच हरवतो