विष आत्मीयतेचे
विष आत्मीयतेचे
विष आत्मियतेचे पिऊन टाकले
शेष देहाचे तुकडे फेकले
शून्य उरती सर्वात शेवटी
गर्दीमध्ये असे सर्व एकटी
जमवाजमव केली थोड्या सुखांची
रेषा मोजती वाळलेल्या नखांची
पूंजी खोटी जमाव खोटा
असे इथे शुद्धतेचा तोटा
वस्त्र सफेद मंन काळं
राखेत रहातो फक्त गाळं
भौतिक सुखाच्या शब्दात जगती
रिकाम्या वाटेचे रिकामे सोबती
अंतिम सुखाच्या जागेची लढाई
होणे नाही याची उतराई