अशी कशी माणसं ?
अशी कशी माणसं ?
अशी कशी माणसं? जणू सोपटलेली कणसं
येतात जातात कोरडेच गोडवे गातात
ओठात एक अन पोटात ठेवतात वेगळे
मुखवटे धारण करून असतात सगळे
अशी कशी माणसं ? जणू सोपटलेली कणसं
तोंडावर बोलतात गॉड असतात मात्र द्वाड
मन मोठं दाखवतात ,खोटं - खोटं वागतात
शकुनी छबी तरीही धर्मराजाची दाखवतात
अशी कशी माणसं ? जणू सोपटलेली कणसं
प्रेम आपुलकीसाठी उसनं अवसान आणतात
जिव्हाळ्याची नाती स्टेटस नी पैशात तोलतात
छत्तीस नखरे अन सरड्यासारखी रंग बदलतात
अशी कशी माणसं ? जणू सोपटलेली कणसं
आले तसे जग सोडून जातील केंव्हाही तरीही
वेळ काळाचं भान नाही ना तारतम्य त्यांना
रक्तपिपासु मेलेल्यांनाही सोडत नाही लुटतांना
