STORYMIRROR

Vasudha Naik

Abstract

3  

Vasudha Naik

Abstract

अशा सांजवेळी...

अशा सांजवेळी...

1 min
346

अशा सांजवेळी

मनी काहूर दाटते

यावा धनी घरा नीट 

मन त्याच्याकडे धावते....


अशा सांजवेळी

मुलगी घरातच हवी

कितीही बरोबरी करा मुलाची

पण सांजसमयी फिरू शकत नाही...


अशा सांजवेळी

देवाला सांजवात लावावी

नामस्मरण करावे मनापासून

धूप अगरबत्ती करावी...


अशा सांजसमयी

वृद्धांची काळजी घ्यावी

हाताला धरून फिरावयास न्यावे

त्यांची विचारपूस करावी...


अशा सांजसमयी

मुलांचा अभ्यास घ्यावा

बोधकथेतून चांगल्या विचारांचा

बालमनावर ठसा उमटवावा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract