STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

असे व्हावे कधीतरी

असे व्हावे कधीतरी

1 min
850


असे व्हावे कधीतरी


असे व्हावे कधीतरी

आबादानी सारे रान

बळीराजा तो समृद्ध

धरणीच्या ओटी दान।


दांडा- दांडातून वाहो

खळखळ पाणी निळं

घाम रक्ताचा करण्या

बळीराजा मिळो बळ।


घास सुखाचा नित्यची

अन्न दात्याच्या ताटात

तेव्हा सुखाची भाकरी

जग खाईल सुखात।


ऋण काळ्या माऊलीचे

फेडायचे परोपरी

फुलायाचे मनाजोगे

असे व्हावे कधीतरी।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational