असाही तो लेखक
असाही तो लेखक
ज्याला नसते फारशी ओळख
तरीही आपल्या लेखणीतून तो
करीत असतो आपल्या गुणांची पारख
असाही तो लेखक
नसेल त्याची फार प्रचिती
त्यांच्या कथा, कवितांची नाही आभासी जगात भ्रमंती
खचून जाऊन तो देत नसतो
आपल्या मनातील भावनांना स्थगिती
असाही तो लेखक
नसेल त्याचे फार कोणी चाहते
त्याचे शब्दच मात्र मनावर घाव घालते अन् माणसांच्या गर्दीत पंखहीन प्रवासात
त्याचा शब्द सुमनात त्याचे मन दिलखुलास रमते
असाही तो लेखक
ज्याला कविता, लेख लिहिण्याचा आगळा वेगळा छंद कल्पकता,
शब्दरचना, अंतरंगीचे भाव यात होतो बेधुंद...
