असा उधाणलेला वारा...
असा उधाणलेला वारा...
असा उधाणलेला वारा ,
सागरांच्या लहरी सवे ,
बेभान उडवून लाटांना,
फेसाळून गाते ,
प्रिया येना सवे ,
चालू या रेशीम वाळूवर ,
अलगद उमटता ठसे पावलांचे,
विरु दे त्या पाण्यात पुन्हा ,
हा खेळ खेळू प्रेमात ,
तुझ्या माझ्या आनंदात ,
खऱ्या प्रेमाची साक्ष ,
हसेल चंद्र उगवतांना ,
फिक्या रात्रीचे रंग ,
पसरेल पानापानावर ,
थबकेल सांजेच्या दारावर ,
ओघळत येतील दव प्रेमाचे,
ओल क्षितीजाला येईल ,
प्रेमाचा गारवा घेऊन वारा ,
शहारेल गंधाळेल पारवा ,
असा उधाणलेला वारा ...

