STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

अर्थ शब्दांचे

अर्थ शब्दांचे

1 min
290

अर्थ बडबडण्याला

नसे प्रेमामधे कधी

सुख अपार असीम

निरर्थक शब्दांमधी


भावनांच्या झोक्यावरी

झुलविले हळुवार

रेशीमस्पर्शाने मन

मोरपीस अलवार


यौवनाच्या प्रांगणात

नसे विचार पुढला

सप्तपदी बंधनात

दिले सर्वस्व तुजला


कधीकधी वादांमधे

झाला अर्थाचा अनर्थ

शब्द वाढला शब्दाने

समजावे कसे व्यर्थ 


घटस्फोट नोटीसीत

अर्थ समजे शब्दांचा

कटू शब्दांनी सावध

अर्थ कळे जीवनाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract