अरे वेड्या ...
अरे वेड्या ...
अबोला हा माझा तुला कळेना ,
अरे वेड्या का? तुला हे जमेना ...
भावनांचा माझ्या कल्लोळ येथे,
तुझ्या डोळ्यांना काही दिसेना ...
तु अंतर्यामी नाही सांगुन झाले ,
तरी वाटते मला का? तु ओळखेना ...
शब्दांची ममता पाझरावी तुझ्याही ,
का? तुझे शब्द माझ्या शब्दांस भेटेना ...
ओसरून गेली सांजेची नव्हाळी ,
ती जुनी प्रिती आता प्रितीत उरेना ...
अगं वेडे किती तर्क तुझे लावुनी झाले ,
श्वास घे जरासा हृदयातले नाव तुझे मिटेना ...
जमे ना मला रोज फुल गुलाबाचे देणे ,
दिवस माझा तुझ्याशिवाय उजळेना ...
नाही चंद्र तारे ना आणेल सुर्य ,
सागर किनारे अन् शंख शिंपलेही सुचेना ...
मी आधार देईल त्या गर्द सावलीचा ,
जरी आले उन्हाळे ते तुझ्यावर बितेना ...

