अरे शहरी माणसा
अरे शहरी माणसा
शेतकऱ्यांना लुटणा-यांची
कमी नाही राहीली
शहरात नौकरी करणा-यांची
नीच नीती आजवर नाही पाहिली.....
घाम गाळणा-या बळीराजाला
लोकं व्याजाने पैसे देतात
बळीराजाच्या कष्टाचे पैसे
फुकट शहरात बसून खातात......
लालच पैशाची पहा
किती नीच थराला नेते
पोटाला चिमटामारून जगणाऱ्या
शेतकऱ्यांना ही दगा देते......
अरे शहरी माणसा
कधी तूला कळणार रे
बळीराजाच्या कष्टाच्या भाकरीची
फक्त हळहळ तुला मिळणार रे.....
अस्सल ला अस्सल घेतलसं
तर काळजातून तो आशीर्वाद देणारं
तुझ्या बायको पोरांना कधी
उपासमारीची वेळ नाही येणारं.....
लुटण्यासाठी अखं जग आहे
पण त्या शेतकऱ्यांना नको लुटू
पैशाच्या मोहात माणसा
एवढा निर्दयी पल्ला नको गाठू
