STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Inspirational

4  

Chaitrali Dhamankar

Inspirational

अर्धांगिनी

अर्धांगिनी

1 min
322

दोन मनांची झाली पसंती 

होकाराची खुलली गालावर कळी 

लगीनघाई झाली सुरु 

स्वप्नांच्या दुनीयेत रमले मी खुळी ||


लग्नघटिका समिप येता 

पाश मागचे तुटू लागले 

सप्तपदी चालले तुझ्यासवे 

सर्वार्थाने तुझी जाहले ||


लोळण सुखाची पायावरती 

कष्ट सोसतोस त्याचसाठी 

कितीही यातना असतील हृदयी 

सुहास्य मात्र सदैव ओठी ||


सुखात हसते तुझ्यासंगती 

दु:ख मांडते तुझ्याच समोरी 

तुच माझे सासर माहेर 

उभा रहा पाठीशी जन्मभरी ||


अखेरीस हे तुला सांगणे 

तु राजा मी तुझीच राणी 

एकदा कर हृदय मोकळे 

तेव्हाच होईन मी तुझी अर्धांगिनी ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational