Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chaitrali Dhamankar

Others

3  

Chaitrali Dhamankar

Others

खेळ दैवाचा

खेळ दैवाचा

1 min
403


अशा सांज वेळी 

का ग डोळ्या तुझ्या पाणी 

का पाहतेस वाट 

नाही येणार आज कोणी ||

नको पाहूस अशी स्वप्ने 

ज्याला नाही काळ वेळ 

नशिबानेच सारे मिळते 

हा दैवाचाच सारा खेळ ||

दुःखातच मान तु सुख 

सुखातच दुःख थोडेसे 

उशिरा का होईना कळले 

प्रेमाचे स्पर्श काहीसे ||

ओसंडून वाहूदे ओंजळ 

एवढे प्रेम कर अर्पण 

त्यालाही कधीतरी होउदे 

तुझ्यासाठी स्वतःला दर्पण ||

होत असेल जीव त्याचाही 

कधीतरी थोडा कासाविस 

त्यालाही असेल वाटत 

तु त्याच्या जवळ असाविस ||

येईल तुला भेटाया 

एवढा ठेव विश्वास 

कर्तव्यात असेल अडकला 

तरीही त्याचा तुच श्वास ||


Rate this content
Log in