साद
साद
रोजचेच आहे तुझे
स्वप्नात माझ्या येणे
येताच माझ्या गालावरती
हळूच चुंबन घेणे ||
ओठावरच्या पाकळ्यांना
अलगद खुलून देणे
मिटलेल्या पापण्यांना
मनातून साद घालणे ||
उघडताच डोळे
तु समोर नसणे
पुन्हा वेड्या रात्रीची
आतुरतेने वाट बघणे ||
प्रेमात होते असेच
हे तर मी मानतेच
तरीही येऊन स्वप्नात
स्वप्न माझे भंगतेच |