शब्दांची भाषा
शब्दांची भाषा
कसे समजावू तुला
कधी कळेल न सांगता
उरली जी मनात व्यथा
हातातून तुझा हात सुटता ||
कासावीस मन माझे
वेडेपिसे भोवती तुझ्या
तुझ्या डोळ्यांच्या सागरात
लहर शब्दांची माझ्या ||
अतूट प्रेम तुझ्यावर
जरी असलास दूर
मिळायचे ते मिळतातच
हवेत जरी विरले सूर ||
अजूनही ओढ तितकीच
होती पहिल्या भेटीची
कधी कळेल तुला
भाषा माझ्या शब्दांची ||