मैत्री
मैत्री
1 min
401
पहिल्यापासून आवडत होती
एक बाहुली शाळेमधली
कधी न उघडली कवाडे मी
भावनांची हृदयामधली ||
काळ लोटला वर्ष लोटली
पुन्हा आली समोर मैत्री
भेटीनंतर भासू लागले
कशा सरतील पुढील रात्री ||
वाढू लागल्या भेटी गाठी
कधी अचानक कधी ठरवून
मैत्रीला त्या ठेच न लागो
टाका पाऊले जरा जपून ||
दु:ख आपली विसरून जातो
मित्रांसोबत कटींग चहाने
शोधत राहतो रोजच आपण
भेटण्यासाठी असंख्य बहाणे ||
आस लागते पुढील भेटीची
आहे तो वेळही पडतो कमी
हसणे गप्पा संपत नाहीत
तेव्हा येते व्हॉट्सॲप कामी ||