Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chaitrali Dhamankar

Inspirational

3  

Chaitrali Dhamankar

Inspirational

स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्री जन्मा तुझी कहाणी

1 min
925


आज जाहला जन्म आपला

भाव मनातील अर्पण्यासाठी

प्रेम आंतरिक बरसत राहू

असो नसो कोणी आपल्या पाठी||


रुप गोजिरे पाहुनी आपले

डोळ्यांमधले भाव बोलती

नितळ कांती पाहता क्षणी

देहावरुनी नजरा फिरती ||


या साऱ्यातून करत राहू या

बचाव आपल्या शालीनतेचा

कणखर बनुनी शिळेप्रमाणे

मनात फुटूदे पाझर मातेचा ||


कष्ट करणे आपल्या नशिबी

तारेवरची होते कसरत

जरी असला पुरूष बिनकामी

बसतो स्वतःचा अहंकार जपत ||


वंश वाढवून आपण घेतो

माता बनुनी पुनर्जन्म

कर्तृृत्व मात्र उजळत राहते

पुरुषी पित्याचे भोवती आजन्म ||


आता देऊ तोंड अन्यायाला

बदलू आपली विचारसरणी

देत घोषणा पसरवू भोवती

स्त्री जन्मा तुझी कहाणी||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational