विरह
विरह
किती पाहू वाट आता
अश्रू सारे सुकले रे
आटले का ते प्रेम सख्या
जे माझ्यावर केले रे ||
संयम माझा नकळत सुटला
लाज सोडली तुझ्या मिठीत
नाही वाटले मला कधी
जवळ येईन पहिल्या भेटीत ||
स्वर्गसुखाचा आनंद देतो
गंध आणि श्वास तुझा
जरी नसलास जवळ
तरीही मनातून तुच माझा ||
ओळखते मी तुला राजसा
तुझ्या अंतरिक श्वासाने
जरी झाले कधी आंधळी
ओळखेन तुझ्या स्पर्शाने ||
नाही केले आजवर मी
प्रेम कुणावर तुझ्याशिवाय
कळले मलाही नाही अस्तित्व
कृष्णाचे ही राधे शिवाय ||

