STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Others

4  

Chaitrali Dhamankar

Others

दूरदेशी

दूरदेशी

1 min
299

जाताना मी दूरदेशी 

हात निसटला हातातून

मन राहिले तुझ्यापाशी 

अश्रू ओघळले डोळ्यातून ||

फिरुनी परत ये सखे 

संकेत होता स्पर्शात 

जीवन राहिले जगायचे 

नको सोडू अशी अर्ध्यात ||

पाश अलगद तुटले 

मणी निखळले माळेतून 

पुन्हा ओवूया धाग्यामध्ये 

आवाज येतसे नभातून ||

पुन्हा माझ्या श्वासाकडे 

चुंबकापरी गेले धावून 

होता तिथेच जिथे सोडले 

कोसळला मिठीत मला पाहून ||


Rate this content
Log in