STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract Others

4  

Dhananjay Deshmukh

Abstract Others

अपेक्षा...

अपेक्षा...

1 min
1.1K

निरपेक्ष असा कोणीच नाही इथे

घेऊन ओझे अपेक्षांचे प्रत्येक जण वावरतो

ठेवतो कुणी कायमचे मनात ते

तर कुणी अपेक्षाभंगातही स्वतःला सावरतो...


का करावी कुणी कुणाकडून अपेक्षा

निराशाच पदरी आपल्या जर येणार असेल

नाहीच करावी कुणी कुणाकडून अपेक्षा

जर अपेक्षांचा त्या भंग होणार असेल...


उधळून द्यावी स्वप्नं स्वार्थाची सारी

निराशेपेक्षा निरपेक्ष आपले जीवन असावे

करणे सोडावे अपेक्षा इतरांकडून

आपणच स्वतःकडून थोडे अपेक्षित असावे...


द्यावे झोकून स्वतःला परिश्रमाच्या दरीत

मग अपेक्षांचे पर्वतही तेथे ठेंगणे वाटतील

नाहीच लागणार ठेच कुठे अपेक्षाभंगाची

वाटेत येणार्‍या दगडांचेही आपोआप फुलं होतील...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract