अपेक्षा च्या सागरांत...
अपेक्षा च्या सागरांत...
अपेक्षा च्या सागरांत मी,
नेहमी चं वाहवतं गेले.
भरती - ओहोटी च्या खेळांत,
मी नेहमी अडकतं गेले.
कधी सैरभैर झाले मन,
कधी सागराचा तळ गाठला.
तळाशी खोल मगं माझ्या,
आसवांचा ही बांध साचला.
कधी वर, कधी खाली,
मी सागरांत तरगंत होते.
लाटां च्या मनस्वी झोक्यावर,
श्वासांचे झोके घेतं होते.
अपेक्षा च्या सागरांत या,
मी आयुष्याचा सारं पाहिला.
जगण्याचा एक नवा कानमंत्र,
मला परतीच्या प्रवासाने दिला..!!
