STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

अनुभव

अनुभव

1 min
341

आयुष्यात रोज घडणारी प्रत्येक गोष्ट

एक नवीन अनुभव असते 

जीवनात अनुभवासारखी कुठे ही

शिदोरीही नसते 

विचारता कोणास तर अनुभव हा सर्वांच्या उदरी वसते अनुभवाच्या बोलीने होई उपरती

पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे सार्थ ठरते

एखादे कार्य करताना चुकल्यास

लहान मोठे, खरे खोटे सगळ्यांना पारखत

खूप काही शिकण्यास मिळते

व्यवस्थितरीत्या बुद्धीचा वापर केला तर

अनुभवामुळे जीवनास गतीही  प्राप्त होते 

मार्ग दाखविणारे खूप चांगल्या मार्गाला नेणारा एक आपल्याबद्दल विचार करणारे खुप

विचारणारा एक तो आपला वेळ असते 

परीक्षेतील प्रश्नासाठी पुस्तके

तर आयुष्यातील प्रश्नासाठी अनुभव कामी येत असते

अनुभवाचं परिणाम हे वय नाही तर खाल्लेल्या खस्ता आणि आलेलं अपयश असते 

कधी आपण अनुभवातून जातो तर कधी अनुभव आपल्यातून

 संमिश्र भावनांचं मिश्रण जणू अनुभव म्हणजे आपण सतत उपभोगत असलेली नाविन्यता असते 

म्हणूनच जीवनात काय करावे करून अनुभवाच जतन एखाद्याला सांगून तर बघावे थांबेल त्याचे अधःपतन

इतरांचे अनुभव वाचावे, आपले लिहून ठेवावे

सदाचार सदैव करूनी

आयुष्यात नवे रंग हे भरावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract