अनुभव हा असा
अनुभव हा असा
मुलगी जन्मास आली
सर्व जण आनंदली
मुलगी वयात आली
बोहल्यावर चढली
पती ,पत्नी सुखावली
सासरची मंडळी आनंदली
आला अनुभव हा असा //१//
चार दिवस सासुचे
चार दिवस सुनेचे
पण चार दिवस सूनेचे
नव्हते ते कधीचे
आला अनुभव हा असा //२//
सुनेला मुलगा झाला
वंशाला दिवा जन्मला
सासरच्या मंडळींना
लाॅटरी लागल्याचा
भ्रम झाला
अाला अनुभव हा असा//३//
छोट्या लाॅटरीचे संगोपन झाले
पती,पत्नीचे पटेनासे झाले
सासु तोंडसुख घेवू लागली
दीर,नणंद पाणउतारा करू लागली
सुनेचे जगणे मुश्कील होऊ लागले
आला अनुभव हा असा//४//
जाच सहन करुन,करून
वर्षे लागली उलटायला
हैराण झाली ती सून
नवर्याने तोडला विश्वास
आली परत मुलगी माहेरास..
आला अनुभव हा असा//५//
