अंतरीच्या खोल डोही..!
अंतरीच्या खोल डोही..!
स्वप्न वेडे
फसवेच भास काही
अंतरीच्या डोही
खोल...!
सृजनातील अधिरता
रात्र किती जागवते
अधीर होते
मिलनास...!
उल्केत गुंतलेले
स्वप्न झाकल्या मुठीचे
बंध अंतरीचे
कळेना...!
नात्यांचे धागे
अंतरीच्या खोल डोही
वळून पाही
सदैव...!
वाहते निरंतर
रात्र काळोखात मौन
आत्मसंवादी संभाषण
चाले...!
वेदनेची कळ
निद्रा सुखाची नाही
अंतरीच्या डोही
खोल...!
जड पापण्यांचे
भार अंतरीच्या डोही
शोधत राही
ठाव...!
सौ. प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
