अंतिम घटका
अंतिम घटका
आयुष्यातील अंतिम घटका समीप येता....
चलचित्रपट जीवनातील डोळ्यांसमोर राहिला उभा ....
अनेक सुखद घटना मनास शांती आणि डोळ्यांत
आनंदअश्रु देऊन गेल्या ...
दुःखद घटनांही हृदय हेलावून गेल्या.....
मिळाला अनेक नाती संबधी चा मोलाचा सहभाग... रुसवे फुगवे जरी झाले.....तरी नसे मनात राग...
अनेक कार्य पार पाडली... जबाबदारी निभावली...
पाहूनी कुटुंबियांना आनंदी, मी ही सुखावली....
आता मरणाची नाही भिती. ...
पाप पुण्याचे गाठोडं आहे सोबती..
चित्रपट समाप्त होईल कधीही...
त्या यमदेवाची चाहूल येता चित्ती....
आत्मा चलबिचल चौफेर झालासी..
आता हा अंत नक्की.... घेऊनी आशा ही मोक्षप्राप्तीची...
