अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी
अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी


अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी
घडवून आणली वेगळी क्रांती
घेतली नाही कधीही विश्रांती
थाटात मानली जाते जयंती!!
अण्णाभाऊ साठेंचे कयास
परिश्रमाने केला प्रयास
लिहून गायले १३ पोवाडे
ख्यातनाम ३४ उपन्यास!!
साठेजी दलित साहित्यकार
प्रयत्नाने केले नेक आविष्कार
मनुवाद्यांनी केला बहिष्कार
साठेंचे विचार करतो स्वीकार!!
१ ऑगस्ट १९२०ला भारतात जन्मले
परिवर्तनवादी विचाराने कडाडले
अण्णाभाऊ साठे गरीबांचे कैवारी
मनुवादी पडले वैचारिक आजारी!!
अण्णाभाऊ साठेंचा थोर इतिहास
अजूनही वाटत नाही विश्र्वास
वैचारिक पातळी होती महान
अनेकांची भागवली तहान !!
साठेंच्या विचारांना नतमस्तक
कार्याने झाले भारतात सार्थक
मोलांच्या विचारांना देतो स्विकॄती
शब्दसुमनाने मानतो पुण्यतिथी!!