अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
आमावास्येची काळीकुट्ट रात्र
अंधारलेली स्मशानभूमी
समोर धडधडणारी चिता
अवतीभवती शे-दोनशे
तरणीबांड पोरं
डोळ्यांत प्राण एकवटून
भुताची वाट पाहताहेत
आजूबाजूला अस्ताव्यस्तपणे विखुरलेल्या
बाटल्या न् बिड्यांची थोटकं न् समोरची
पेटलेली चिता हळूहळू थंडावताहेत
हळूहळू डोळ्यांवर झापड्या येऊ लागल्यात
पण ती भूतं काही आलीच नाहीत
भुतांचे भासही झाले नाहीत
स्मशानाच्या पूर्वेकडच्या बाजूला लाली आली
त्या लालीच्या एकेका किरणांतून
दाभोळकर, कलबुर्गींबरोबरच
अनेक शिलेदार आले
पण....
ते भूतबीत काही आलेच नाही
रेषा अंधश्रद्धेच्या आणखीच अस्पष्ट झाल्या
आणि एका नव्या सूर्याचा सूर्योदय झाला
त्याच स्मशानभूमीत
