STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational Others

3  

Anupama TawarRokade

Inspirational Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
779

आज गावोगावी शहरात

माणसांच्या मना मनात

अंधश्रद्धेचे बी अंकुरते

भीतीने फुलते हे क्षणात


आयुष्यातील अडचणींना

येणाऱ्या कठीण प्रसंगाना

का असे हतबल होतात?

का शरण जातात बुवांना?


अंधश्रद्धा अशी खतपाणी

सदा घालते दुःखी मनाला

सहजच बनविले जाते

बळीचा बकरा मानवाला


भूत प्रेत किंवा पिशाच्छांना

कधी कुठे आहे असा वेळ?

जे नाहीतच ते कसे असे

रचतील आपल्याशी खेळ?


ग्रह तारे अगदीच सारे

व्यस्त आहेत त्यांच्या कामात

मनुष्यच आहे हो रिकामा

त्यांच्याशी नाते जोडण्यात


हे अंधश्रद्धा निर्मूलनाने

सिद्ध केले आहे विज्ञानाने

सारे आहे मानसिक रोग

बरे होतील मेहनतीने


आपले कष्ट आपले काम

आपल्याच हाती येतो दाम 

विज्ञानाची ही देऊन जोड

श्रद्धेला करू असे अजोड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational