अंधश्रद्धा मनाची
अंधश्रद्धा मनाची
आंधळेपणाची गाठली पराकाष्ठा
याला पूरक, मनाचा हा दुबळेपणा
ढोंगी, अशिक्षित, काहीक अडाणी
सर्व मिळुनी देतात अंधश्रद्धेला खतपाणी
देवीच्या नावाचे भस्म अन् लावून अंगारा
लोकांवर भूरळ घालती, जादूटोणा बाबाचा
करणीला घाबरून वेडेपणा करती
निष्पाप प्राण्यांचा मंदिरात बळी देती
ग्रहणाचा गर्भाशी नाही काहीच संबंध
हा तर आहे ग्रहांचा सुरेख मिलाफ
येऊन सगळे बाहेर या परिधीतून
करू जडेनिशी अंधश्रद्धेचे निर्मूलन
