अंधारवाटेला गुरु एक दृष्टी
अंधारवाटेला गुरु एक दृष्टी
अंधारवाटेला गुरु एक दृष्टी
शिष्य सारे घेऊनी चालली
आणि त्यांच्या पुढे चरणी
गळून पडती अवगुण
मग खास होई जगणं
नवं पहात चष्म्यामधून
रंग गुरुचे त्रिलोचनात
तंत्र मार्गाचे भरून जगी
प्रकाश वाहतो मनोमनी
पसरून गंध माणुसकीचा
बीज अंकुरण प्रेमाचा
हिरवळ फुलवून संस्काराचे
जीवन बहरतो तया सर्वांचे
निःस्वार्थ कल्याणतो
असा व्यक्तिमत्व महान
पिढ्यानं पिढीची सभ्यता जपतो
