अंधार
अंधार


अंधार अस्ती डोळे, प्रकाशाला नाही पाठ.
उजेडासी तेल वात, तेल तमाच्या डोळ्यात..
अंधारानी उजेडाची अंत आरंभाची रेषा.
सांज प्रभा ती जोडीती क्षितिजाशी संध्या उषा..२.
उजेडात काय कमी? अंधारात चाले पाप.
तेज दाखवितो सारे, तम् अगदी निष्पाप..३.
प्रीती जुळे, प्रीती फुले, प्रीती लाजे अंधारात.
चंद्रदीप हाती त्याचा तव हसतो गालात..४.
शेजेपास 'त्या' दोघांच्या विजलेली ज्योती होतो.
तहानेलेल्या लोचनानी तव शृंगार पाहतो..५.
हाच रात्रीचा अंधार स्वप्न डोळा फुलवितो.
कला निबीड काळोख पोटी सूर्यास जपतो..६.
आता काळोखाची गुंफा माझ्या अंतरी जाहली.
काळोखाच्या साम्राज्यात जगण्याची रया गेली..७.