अंधार गल्ली
अंधार गल्ली
अंधाऱ्या गल्लीत
रस्त्याच्या गटारावरून
उड्या मारताना
रोज दिसतो
एक डागाळलेला चेहरा
काळवंडलेले कपडे घालणारा
पाठ पोट एक झालेला
डोक्याला मुंडास घालणारा
यांच अंधाऱ्या काळोखात
हरवलंय त्याच बालपण
नासलंय तरूणपण
पण ...
हा तरूण म्हातारा
लढतोय आपला किल्ला
पोसतोय आपल्या अवतीभवतीच्या
थकल्या भागल्या भिंतीला
आणि तो तरूण म्हातारा
यांच अंधाऱ्या गल्लीत
रोज नैराश्यांचे फुरके मारत बसत असतो
कधीतरी जळेल आशेची चूल
कधीतरी श्रावणसरी बरसतील
बांधावरच्या बांभळीला नवीन अंकुर फुटेल
आशेची चूल पेटेल
पण .....
कधी ........... ???
