STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Tragedy

3  

Sheshrao Yelekar

Tragedy

अनाथांची दिवाळी

अनाथांची दिवाळी

1 min
14.9K


आली आली ही दिवाळी

आनंदाचा वर्षाव झाला

जन जनांच्या मनात

नव चैतन्य पुंज प्रकाशित झाला

पण मी एकटाच होतो

आनंदाचा वारा मला लागे ना

आपला म्हणून संसारी

कोणी साधं ही पुसे ना


अनाथ म्हणून जन्म झाला

गरज नव्हती माझ्या जन्माची

पोटातील शी टाकावी तशी

भीक फेकली वासनेची

नाळेचं नातं तोडून

पडलो काडी कचऱ्याच्या कुशीत

उष्ट तुकडे वेचून खाणारा

मी नाही आप्त स्वकियांच्या मुठीत


दिवाळी दसरा विविध संस्कार

सामाजिक मानसांचे उत्सव

समाजाने वाळीत टाकलेला

नको मानवी कळपाची हाव

आता नको यांचा वारा

खुलेआम राजरोस लुटणारा

आताही चटके देऊन जातात

यांच्या दुनियेत उगवणारे सुर्य तारा


अनाथ म्हणून जन्मलो

लाचारीची रोज सकाळी गातो भुपाळी

एक वेळच्या जेवणात

रोज साजरी होते अनाथांची दिवाळी

हात जोडून आर्त हाक ही मारतो

माणूस म्हणून तुमच्यात घ्याल का

या अनाथांच्या दिवाळीत

आपला समजून सहभाग द्याल का


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy