अन् पंख तुटले होते...
अन् पंख तुटले होते...
आभाळ प्रेम डोळ्यात भरूनी ,
त्यांने पंख पसरले होते,
तोल ठासळूनी पडला ,
अन् पंख तुटले होते ...
तुटलेल्या पंखांचे स्वप्न,
अजूनही तग धरून होते,
फडफड जागेवरूनी,
बळ इच्छाशक्तीने दिले होते...
एक दोन असे कैक वेळा,
पंख पसरले मिटले होते,
पण एक दिवस माझा,
या विश्वासाचे संचित पाठीशी होते...
एका वेळेस कोणतीच गोष्ट,
घडत नाही ऐकले होते,
हाथोडीचे घाव घालूनी,
दगडालाही देवपण आले होते...
