STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics

3  

Prashant Shinde

Action Classics

अलविदा...!

अलविदा...!

1 min
137

सुंदर कविता वाचनात आली

मित्रानेच ती मला पाठवली

जाता जाता बायकोची किंमत

त्या कवितेने मला दाखवली

तसे आम्ही सुजाण सुज्ञ सारे

तरीही अज्ञानाचे मनात उमाळे

स्त्री शक्तीची नानाविधरूपे

जाणूनही राहतो जगा वेगळे

गृहितकाची सवय जीवनात जडली

की ती कधीही नाहीशी होत नाही

सुंभ जळाला तरी पीळ जात नाही

तसाच जानुकांतही बदल होत नाही

तरी पण संकल्प आज मी

मित्राची कविता वाचून केला

तिच्या इच्छापूर्ती साठी आता

कवितेचाच निरोप मी घेतला

कविता माझी तिला वैरीण वाटते

तिच्या नी माझ्यात उगा भांडण लावते

विचार आचारांच्या हिंदोळ्यावर झुलताना

तीच मला दूर नेवून फेकते

दिला शब्द मी तिचा मान राखण्या साठी

तिच्या कष्टाला मानाचा मुजरा करण्या साठी

कवितेने माझ्या तिला खूप छळले

म्हणून तर कवितेचाच मी आज दूर सारले

कश्यात समाधान स्त्रीच असते

ब्रह्मदेवालाही आजवर कळले नाही

त्याने कधी त्याचे स्तोम माजवले नाही

म्हणून कवितेविना माझेही काही अडणार नाही...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action