STORYMIRROR

Umesh Salunke

Tragedy Others

3  

Umesh Salunke

Tragedy Others

अख्खा दिवस रात्र पडतो कमी

अख्खा दिवस रात्र पडतो कमी

1 min
296

अख्खा दिवस रात्र पडतो कमी

स्वतःकडे लक्ष झालं आहे कमी

आजची तरुणाई खुप खेळते रमी.....!


रोज नवनवीन दाखवतात ऑफर

दिवसा झालेला असतो एखाद्या टॉपर

रात्रीच्या वेळी बनलेला दिसतो चौकट राजा

सकाळी खात्यातून पैसे गेल्यावर 

कुणावर फोडायचे खापर राजा

आपलीच फुंगी आपलाच बाजा.

आता तरी सुधर राजा......!


कुठे कधी जाता येता सुरू करता येते

रमी गेम वेळेला किती टेबलावर असतील

डाव. पत्याच्या पानाचा कधी घोळ लक्षात 

येणार नाही भाव. कधी पुढचा आपल्याला

हरवेल याचा अंदाज कुठेच येत नाहीं रावं......!


 खेळ आहे पत्त्याचा 

एका दुरी तीरीचा दशी लाल बदामीचा

नवीन मेम्बरला आपला बनवायचा

तो किलवर राणी बादशहा दाखवून

सगळा डाव एकाचवेळी विस्कटून

त्याचा लावलेला पैसा जिंकून 

त्याला एकंच मानस असतो 

माघार घेईला लावायचा......!


कुणी हजार 

कुणी पन्नास हजार

कुणी लखपती 

कुणी करोडपती

कुणी हाताला काहींच लागतं नाहीं

शेवटी मोबाईल बंद करून रोडपती.....!


रोज सकाळ संध्याकाळ असते

जाहिरात रम्मी ऑफ़र खेळाची

सवड कूट मिळते बघायची.

लक्षणे आहेत घरी बसून घाट

घालण्याची. कष्ट करु नाही वाटतं

नव्या तरुणाईला झटपट पैसा

कसा मिळवु अशीं अवस्था झाली

आता तरुण पिढीची......!


शेवटी आपण एक असतो जोकर

आपलच आयुष्य जगत असताना

बंद करून टाकतो मेंदूचं लॉकर

आपलं जीवन होतं एक हैकर.....


अख्खा दिवस रात्र पडतो कमी

स्वतःकडे लक्ष झालं आहे कमी

आजची तरुणाई खुप खेळते रंमी.....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy