STORYMIRROR

Anisha Sudhir Deshmukh

Tragedy Others

3  

Anisha Sudhir Deshmukh

Tragedy Others

अजून हि निर्भया का ?

अजून हि निर्भया का ?

1 min
154

अंगावर कुर्ती त्या वर हि ओढणी होती टाकली 

तरी त्याची वाईट नजर माझ्या वरच का पडली ? //१//


ना अंधार होता ना होता सामसूम रस्ता 

भर चौकात चार चौघात मझ्या आब्रूचा खेळ का ? //२//


आक्रोश करत होते कोणी तरी या मदतीला ..कोणी तरी या मदतीला

रोज माझी माप काढणारी आज आंधळी अन भैरी झाली तरी का ?//३//


स्वयंपाक धून भांडी सगळ शिकवणारी माझी आई 

मला स्वरक्षण करायला शिकवण कस काय विसरली? //४//


माझी एक एक किंचाळी , भर रस्त्यावर निघालेले आब्रूचे धिंडोरे

आणि त्याच रस्त्यावरून या सगळ्याकडे मान फिरवून जाणारे लोक//५// 


डोळ्यातल्या पाण्यासोबत, शरीरातून वाहणार रक्त 

आणि या सगळ्या नंतर दोषी मात्र मीच फक्त //६//

न्यायालयात याचिका दर्शवली न्याय मिळावा म्हणुन

पण तिथे ही केला शाब्दिक बलात्कार चौकशी म्हणून//७//


कित्येक वर्ष अजून निर्भया होणार

आत्यचार करणारा नराधम असाच खुला फिरणार 

फक्तं मेणबत्ती घेऊन अजून किती दिवस न्यायाची अपेक्षा होणार 

माझ्या राजाच्या स्वराज्यात होता तो न्याय कधी एका स्त्रीला मिळणार//८//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy