STORYMIRROR

Poonam Jadhav

Tragedy

3  

Poonam Jadhav

Tragedy

परीक्षा जीवनगाथा__एक परीक्षा

परीक्षा जीवनगाथा__एक परीक्षा

1 min
210

थकलेल्या वाटसरूची ,देवापाशी व्यथा…,

नाही कोणी ऐकणारं,ऐक तुच आता…,


संपलं रे आयुष्य,मी गाठला पैलतीर …,

तरी देवा कळेना रे, जीवनाचा सार,


संघर्षाच्या वाटेवरती,मी चाललो रे दुर…,

तडजोड करून जगण्याशी,आता दमला रे ऊर…,


गरिबीशी लढताना, बालपण गेलं वाहुन …,

तारुण्य आठवतांना,येतो डोळ्यांना पुर…,


लेकरांना वाढवलं, आशेने रे फार…,

वाटलं होतं मनाला, वृद्धापकाळात होतील ते आधार…,


नाही झालं पुर्ण, एकही स्वप्न …,

शोधताना सुख रोजचे,संपतो रात्रंदिन…,


नात्यांची सावलीही,भर ऊन्हात दुरावली

नशीबाची दोर जणू, अलगद हिरावली…,


हताश हे मन,मग झाले व्यसनाधीन…,

अंधारली पाऊलवाट आता‌‌ झाली दिशाहीन…,


चुकली वळणे, तुटल्या सार्या आशा…,

अभागी या ओंजळीत ,पडली नुसती निराशा,


व्यथांनी भरलेली, ही माझी जीवनगाथा...

सांग भगवंता, कधी संपणार ही परीक्षा..

कधी संपणार ही परीक्षा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy