STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

आठवण

आठवण

1 min
144

दिसभराच्या दुराव्यानं 

आठवण येते ही पिल्लांची,

तिन्ही सांजच्या गं वेळेला

ओढ लागते ही घराची


असतील का सुरक्षित

पिल्लं माझी त्या गोठ्यामधी,

कशी पोहोचू मी तयापाशी

जोर नाही राहिला पंखांमधी


बांबूच्या गं बेटामागे

सूर्य हा चालला बाई,

आज मला माझ्या घराचा

मार्ग कसा सापडत नाही


वाढले ठोके काळजाचे

उगीचच्या भितीपोटी,

जीव झाला हा व्याकूळ

लेकरांच्या भेटीसाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy