STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

नाटक

नाटक

1 min
800

हसायचे बघ आलो करून नाटक मी

रडायचे बघ आलो करून नाटक मी 


मला तुला अजमावायचे अता सजणी

रुसायचे बघ आलो करून नाटक मी 


कळेल आज मला शत्रु कोण कोण सखा

लढायचे बघ आलो करून नाटक मी 


कुणास आवडतो मी बघायचेच मला

मरायचे बघ आलो करून नाटक मी


मुला असे शिकतांना निजायचे नसते

शिकायचे बघ आलो करून नाटक मी 


उन्हात जीवन माझे जळून राख उडे

जगायचे बघ आलो करून नाटक मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy