गझल युद्ध
गझल युद्ध
किती उद्रेक तोफांचा बघावा
किती वर्षाव गोळ्यांचा बघावा
इथे बागा फुलांच्या काल होत्या
किती आक्रोश जखमांचा बघावा
कुठे आधार शोधू मी कळेना
किती अंगार ज्वालांचा बघावा
गुलाबी देश होता प्रेमिकांचा
किती दु:खांत प्रेमांचा बघावा
पुढे विज्ञान गेले खूप आता
किती संहार शस्त्रांचा बघावा